भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ ई व्ही एम विरोधात एप्रिल मध्ये जेलभरो आंदोलन करणार -वामन मेश्राम
शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी शिरूर (जि. पुणे) येथील ऐतिहासिक संविधान चौकात "मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा" अंतर्गत भव्य जनसभा उत्साहात व यशस्वीपणे पार पडली. या सभेचे उद्घाटन मा. माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंपाचे डॉ. मगन ससाणे, प्रोटानचे गोरखनाथ वेताळ यांनी मार्गदर्शन केले.
बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य महासचिव फिरोज भाई सय्यद हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सभेत अधिवक्ता शिरीष जी लोळगे, डॉ. सतीश वाघमारे, प्रा. सुरेश ढवळे, गणेश जगताप, डॉ बेद्रे, माजी नगरसेवक, संजय देशमुख, मायाताई गायकवाड, मुजफ्फर कुरेशी, आबिद शेख, उद्योजक किरण पठारे, अर्शद शेख, तसेच अनेक मान्यवर, कार्यकर्ते, व समाजबांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम हे होते, वामन मेश्राम यांनी बहुजन समाजाला एकत्र येऊन त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन केले. ईव्हीएम च्या विरोधात एकजूट होऊन संघर्ष करावा लागेल त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर जेलभरो व भारत बंद आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न करावे त्या शिवाय पर्याय नाही असे सांगितले.
उपस्थित मान्यवरांनी सामाजिक न्याय व समानतेच्या लढ्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. विशेषतः "चलो गाव की ओर, चलो बुथ की ओर" या घोषवाक्यास प्रोत्साहन देत समाज बांधवांना एकजूट ठेवण्याचे महत्त्व विशद केले.
सभेसाठी आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी प्रवीण शिशुपाल सोशल फाउंडेशनच्या वतीने जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती, ज्याबद्दल उपस्थितांनी विशेष आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळ, स्वयंसेवक व स्थानिक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान लाभले. या सभेने बहुजन समाजाच्या संघटन आणि संघर्षाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे.
